Sunday, March 17, 2024

आय एम विनर स्पर्धा परीक्षा

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा संचलित* 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 *आय. एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध* 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 परीक्षेची सॅम्पल pdf स्वरूपातील पुस्तके खालील प्रमाणे आहेत. 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 *Website* :- dhyeyaprakashan.com *YouTube* https: youtube.com/channel/UC94XzYeZP23N6znV6Fuq2aQ 📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖 संपर्क:--9403002669 🏅🎯🥇🏆🥉🎖️🥈🏅🎯🥇🏆🥉🎖️🥈 *माध्यम-मराठी/सेमी* 💐🏆🥇🎯🏅🎯🥇🥇🏆🏆🥉🥉 *ऑनलाइन मोफत मार्गदर्शन वर्ग* *ऑनलाईन मोफत टेस्ट* *ऑनलाइन मोफत वॉट्सप मार्गदर्शन* *ऑनलाईन मोफत युट्युब मार्गदर्शन* 🥉🎖️🥈🥉🎖️🎖️🏅🥇🥉🎖️🥈🥉 *इयत्ता पहिली विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका* https://drive.google.com/file/d/1vcoYpKXxXfTEbvx3MrsNvI7NyymZtzXb/view?usp=drivesdk *इयत्ता पहिली विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://drive.google.com/file/d/1w6SsSneEW1IMm4OJ6EsppPjZlruogMsz/view?usp=drivesdk *इयत्ता दुसरी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका* https://drive.google.com/file/d/1wIJBNmcWLdgrOIX-SA6U_08UfVjTfuHE/view?usp=drivesdk *इयत्ता दुसरी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://drive.google.com/file/d/1w-IAjRJNjMSYT1Q0Q796ru7w98lT4iSL/view?usp=drivesdk *इयत्ता तिसरी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका* https://drive.google.com/file/d/1wW_il_nWqg22Tz5o13-XTp3aOqm9Epu0/view?usp=drivesdk *इयत्ता तिसरी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://drive.google.com/file/d/1w7pXg5kyHEHuZir6ez2m_Fstr6UqqSQg/view?usp=drivesdk *इयत्ता चौथी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका* https://drive.google.com/file/d/1vrK1nDLZlUul0mktuw0JOlVHnt-6MFSf/view?usp=drivesdk *इयत्ता चौथी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://drive.google.com/file/d/1wEv0ESs4kAkKli0PkP9LK-EpezUaxfKv/view?usp=drivesdk *इयत्ता पाचवी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका* https://drive.google.com/file/d/1vd9oYtNKn4kOBbMxPc0xXhgcRcRFYKjg/view?usp=drivesdk *इयत्ता पाचवी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://drive.google.com/file/d/1wEv0ESs4kAkKli0PkP9LK-EpezUaxfKv/view?usp=drivesdk *इयत्ता सहावी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका* https://drive.google.com/file/d/1vmJr7SBnX7H4z54oz1yQnLoALrzp-RN5/view?usp=drivesdk *इयत्ता सहावी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://drive.google.com/file/d/1vj_DhPg4iVr028ipXR2eY3r81iwcGkUR/view?usp=drivesdk *इयत्ता सातवी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका* https://drive.google.com/file/d/1vfqtw8HcMUA5PBlrkvrvTDqL-1PHzyTz/view?usp=drivesdk *इयत्ता सातवी विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका संच* https://drive.google.com/file/d/1vemgCmx_LB8-w7dunI1l04S0V0QE4Oly/view?usp=drivesdk 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 *Email:- dhyeyaprakashan21@gmail.com* 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

Monday, March 14, 2022

नेहमीच सकारात्मक जीवनात सकारात्मकता महत्वाची आहे

Wednesday, June 10, 2020

Facebook page

http://www.facebook.com/113737870371862/photos/a.113741540371495/113741480371501/?type=3&scmts=scwspsdd&extid=77RuLxCntgla2DUR https://www.facebook.com/100051007212040/posts/128588742184699/?flite=scwspnss&extid=gycDHP12wg6lgtNJ 1. https://youtu.be/8yCOo3j-cz8 2. https://youtu.be/HqW_eE-U2I8 3. https://youtu.be/GHdNKuPhDcg 4.

Tuesday, June 9, 2020

माणूस मागे असण्याची २३ कारणे…!!!!

*आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून…* 1. *कमी प्रवास* *प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.* 2. *अति राजकारण* *सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष.* 3. *दोनच हात कमावणारे* *सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे.* 4. *सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला* – *कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.* ५) *खोटं बोल पण रेटून बोल* – *सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत.* ६) *आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष* – *आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, थातुरमातुर उपचार केले जातात. योग्य आहार नाही, व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. भरपूर पैसा व्यसनातच संपतो.* ७) *आर्थिक निरक्षरता* – *पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते.* ८) *दूरदृष्टीचा अभाव* – *पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात.* ९) *ऐतिहासिक स्वप्नात* – *अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. जास्तीजास्त वेळ फेसबुक व्हाट्सएप वर कोणी कधी काय केले ते शोधत फिरतो, आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो, तेव्हा सत्य आणि सध्याच्या परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे.* १०) *गृहकलह, कोर्टकचेरी* – *गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.* ११) *समाज अर्थपुरवठा पद्धत* – *नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही. आता तर सरकार ने नवीन व्यावसायिकांसाठी 5 लाखांपर्यंत कर्जयोजना सूरु केली आहे, ज्यात बिना गैरेंटी कर्ज उपलब्ध आहे, पण त्याबद्दल काहीच माहिती करून घेत नाहीत.* १२) *जनरेशन गॅप* – *खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही.* १३) *ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट* – *प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार…. व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो.* १४) *धरसोड वृत्ती* – *हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी… कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती…हे काम केले तर लोकं काय म्हणतील??? अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.* १५) *कष्टाची लाज* – *विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरातही कामं करण्यास लाजं वाटते.* १६) *फालतू बाबींना महत्व* – *एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला… पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, होर्डिंग ववर नाव माही टाकले, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे.* १७) *दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद* – *भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात…मित्रांचे व्यवसायात नुकसान झाले, बरं झालं मी आधीच सांगत होतो नको करू, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे “आश्चर्य”…!!! मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे…!!!* १८) *इंग्रजी कच्चे* – *मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून इंग्रजीवर राग दाखवून काही होणार नाही.* १९) *संवादकौशल्याचा अभ्यास* – *जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.* २०) *चाकोरी मोडत नाही* – *अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी – पंचायत – ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.* २१) *जाती प्रथा* – *(फालतू प्रथा) 21व्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म – पंथ – जात – पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही. आणि याचा फायदा इतरांना होतो.अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला; स्वतःची एक व्यक्ती म्हणून दमडीची अचीव्हमेंट नसताना; चक्क अभिमान वाटतो.* २२) *वेळेची किंमत* – *वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.* २३) *ग्राहकाला किंमत न देणे* – *ग्राहक म्हणजे राजा समजला जातो पण अपल्याकडे तसे होत नाही, ग्राहकाला समोर रुबाब दाखवणे, तसेच ऐन कामाच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवणे आणि ग्राहकाला दिलेलं वेळ न पाळणे, 10 ची वेळ सांगून 11 ला पोचणे, याने ग्राहक सुद्धा निसटतो. आणि आपला रेफरन्स पुढे कोणाला देत नाही*. *वरील सर्व गुण अवगुण महाराष्ट्रातील प्रत्येक ज़ात, पंथ, धर्मांच्या लोकांत आहेत म्हणून महाराष्ट्रीयन लोक उद्योग धंद्यात मागासलेला आहे.*

Tuesday, June 2, 2020

मित्र हो आपल्या स्वप्नासाठी बदलू या!!

      ""परिवर्तन हे यशाचे गमक आहे!""
     असे आपण ऐकतो पण बदल करायला काडीमात्र तयार होत नाही. याची कारणे अनेक असतील. पण कारण सांगणारा यशस्वी होत नाही, यशस्वी होणारा कारण सांगत नाही.
      एक तर या भूप्रतलावर सामान्य माणसाला आपलें जीवन उंचीवर घेऊन जाण्यासाठी अडचणी खूप असतात, मी तर      बोलेल जन्मताच पर्यायच कमी असतात.

       पहा आपण घराची रचना मध्ये बदल केला. जेवणात , राहणीमानत , संपर्काच्या साधनात, ट्रॅव्हलिंगाच्या साधनात असे कितीतरी बदल आपण केले पण इनकम च्या मार्गात बदल करणं तितकच गरजेचे आहे.
       त्यामुळे आपल्या सध्याच्या कार्यवेळातून फ्री वेळ जो भेटतो तोच वेळ अशा ठिकाणी देऊ जेथे आपल्या इनकम तर येईलचं काही स्वप्न रिटायरमेंट ला होणारी होती ,ती 10 वर्षे,5वर्षे लवकरच झाली तर आपण आपल्या आयुष्यातील तेव्हढीच वर्षे वाचवली.
     पर्याय या जगात भरपूर आहे शोधा, व्हा सक्षम! आज महागाई न थांबणारी गोष्ट आहे,. आज महिन्याच्या शेवटी4000 पगारा व्यतिरिक्त गरज लागली तर पुढे अजून लागणार चं आहे., काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरीच असते.
      चला तर बनवू शसक्त स्वतः ला, कुटुंबाला , देशाला कारण तुम्ही सशक्त तर देश सशक्त!!!
   
            "'      जो अपने कदमो की,
             काबिलियत पर विश्वास राखते हैं।
                        वो हीं अक्सर
                  मंजिल तक पहूँचते हैं।। """"
आर्टिकल आवडलं तर नक्कीच कंमेंट द्या.
 @9834262766

Monday, June 1, 2020

आयुष्यात सुपर यश कसे मिळवावे !!

*- १० टिप्स*
------------------------------------
                यश नशिबाने मिळत नाही व वैभव कधीच अपघाताने मिळत नाही. जे वैभवसंपन्न व यशस्वी झाले त्यांनी स्वतःला अधिक उत्पादनक्षम व प्रभावी बनवण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या. जर तुम्हाला आयुष्यात सुपर सक्सेस मिळवायचे असेल तर श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सवयींवर लक्ष केंद्रित करून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपल्या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत.१० टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीमंत व यशस्वी व्हाल.

         १) गोल सेट करा व बाकी कचरा फेका :-
                                     ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी वचनबध्द व्हा, ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटू नका. ज्यातून काही लाभ होत नाही अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करा.

          २) दैनंदिन सवयी विकसित करा :--
                                            पैसा व यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम सवयी लावणे ही मूलभूत गरज आहे. यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये त्यांच्या दैनंदिन सवयी हाच फरक असतो. यश कोणाला सहज मिळत नसते, त्यासाठी खूप कष्ट, मेहनत, समर्पण व समृध्दीसाठी आवश्यक असणार्‍या सवयी लावणे महत्वाचे असते. उदा. सकाळी लवकर उठणे, डेली प्लॅन तयार करणे, सकस आहार, व्यायाम, ध्येय निश्चिती, टू डू लिस्ट बनवणे, वेळेस महत्व देणे, सर्व कामे वेळेवर पार पाडणे, वाचन करणे, हेतूपूर्वक जोखीम घेणे, नेटवर्किंग, संयम या सर्व सवयी यशस्वी व्यक्ती स्वतःला लावून घेतात.

                 ३) यश व्हीज्युअलाईझ करा :-
                    यशस्वी व्यक्ती स्वतःचे ध्येय सतत डोळ्यासमोर जिवंत ठेवून काम करतात. जेव्हा आपण आपले ध्येय व्हीज्युअलाईझ करतो, तेव्हा नवीन कौशल्ये आत्मसात करणे व चांगल्या सवयी स्वत:ला लावणे या गोष्टी सहजपणे होतात. आपले ध्येय दृष्यमान करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, ते व्हीज्युअलाईझ करा व पुढे चला. यशाचा मार्ग सापडत जाईल सर्व यशस्वी व्यक्ती यशाच्या व्हीज्युअलायझेशनचे महत्व जाणतात. प्रत्यक्ष काम करण्याअगोदर त्यांच्या यशाकडे जाण्याचा रोडमॅप हा त्यांच्या दृष्यमानतेच्या रूपात तयारच असतो. ती योग्यरित्या वापरली तर अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या मनात तुम्ही तुमच्या ध्येयाचे व यशाचे चित्रच तयार केले नसेल तर तुमची अवस्था आंधळ्या माणसासारखी होईल. तुम्हाला यशाची संधी कधीच मिळणार नाही.

               ४) नेटवर्क विकसित करा :--
           समविचारी लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे एक नेटवर्क विकसित करा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या सभोवती यशस्वी लोकांचे नेटवर्क असणे आवश्यक आहे. यशस्वी व्यक्ती आपला बराच वेळ कॉन्फरन्स, मिटींग्ज, बिझनेस क्लब, इव्हेंटस, सेमिनार्स याद्वारे आपले नेटवर्क विकसित करतात. तर काही वेळा फक्त एक कॉफी पुरेशी असते. अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ.

               ५) लवकर सुरुवात करा :--
        उपयोगी व कौशल्याभिमुख शिक्षण घ्या, कमी वेळेत पूर्ण होणारे व कमी शिक्षण घ्या. आपल्या उमेदीचा बराच काळ शिक्षणात व स्पर्धा परीक्षा देण्यात जातो व वय निघून गेल्यावर नोकरी शोधत बसतात. वाया गेलेल्या वेळेचे महत्व वेळ निघून गेल्यावर कळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या व कामाला लागा नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल.

             ६) जागा ठिकाण बदला :*--
         चौकटीबाहेर पडा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तेथील परिस्थितीचे निरीक्षण करा व संधी ओळखा. जगात शिकण्यासारखे बरेच काही असते. प्रवासामुळे अनेक संकल्पना, संधी सुचतात. त्याचा आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.

          ७) माईंड रीड करा :--
         कोणत्याही ध्येयाच्या मागे जाताना यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन अत्यंत खंबीर व संतुलित असावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मनाचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे. आपले मन क्लिअर असेल तरच आपली निर्णयक्षमता प्रभावी ठरते. आपल्या ध्येयावर विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे मनातून विश्लेषण झाले पाहिजे त्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक असते.

            ८) स्वतःशी प्रामाणिक रहा :--
               जर तुम्हाला स्वत:ची ओळख बनवायची असेल, स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. त्यामुळे योग्य निर्णयक्षमता वाढीस लागेल. जे लोक स्वतःशी प्रामाणिक नसतात, त्यांचे करिअर, वैयक्तिक जीवन, प्रतिष्ठा यामध्ये संतुलन नसते. त्यामुळे यश प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात.

            ९) डिसीप्लीन मेंटेन करा :--
               शिस्त हा आपले ध्येय व ध्येयपूर्ती म्हणजेच यश यामधला पूल आहे. आपले आचार, विचार, वर्तन, संभाषण, संबध, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन या सर्वात शिस्त हवीच. जे लोक यशाच्या उच्च शिखरावर पोहचले आहेत त्यांनी आयुष्यात शिस्तीला अति महत्व दिले आहे. शिस्तबद्धता हा यशस्वी व श्रीमंत व्यक्तींमधला सर्वोत्तम गुण आहे, शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते व ध्येय गाठण्यास मदत होते.

                  १०) कम्फर्ट झोनच्या बाहेर या :--
          नवनवीन आव्हान स्वीकारा. डबक्यातले बेडूक डबक्यातच राहते. तुम्ही बेडूक बनू नका. मी आहे त्यात सुखी आहे, उगाचच रिस्क का घेऊ? ही वृत्ती सोडा. नाहीतर एक दिवस पश्चातापाची पाळी येईल. जीवनात बदल घडवण्यासाठी आपल्या मनाने गुरफटलेल्या कोशातून बाहेर पडल्यावरच नवनवीन संधी दिसतील.
 🙏🙏🙏🙏✈✈
@9834262766